Tuesday, November 24, 2009

विजयदुर्गवर शिवस्मारक उभारणार
सकाळ वृत्तसेवा
Monday, August 10th, 2009 AT 9:08 PM
कोल्हापूर - छत्रपती ब्रिगेडतर्फे विजयदुर्गावर शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासंबंधीची माहिती लोकांना व्हावी, यासाठी बुधवारी (ता. 12) विजयदुर्गाविषयी माहिती सांगणारा स्लाईड शो व शिवस्मारकाचा आराखडा दाखवण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडचे अतुल माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होईल. या वेळी वस्ताद आनंदराव ठोंबरे, दिनकर कांबळे, दिगंबर जाधव, सूरज ढोली, नवशक्ती तरुण मंडळ (शेंडूर) यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. माने म्हणाले, ""शिवछत्रपतींनी स्वराज्यासाठी विजयदुर्गचे महत्त्व ओळखले होते; पण हा दुर्गम सागरी किल्ला शासनाच्या उदासीनतेचा बळी ठरला आहे. किल्ल्याच्या संरक्षणासाठी विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे. किल्ल्यावर शिवस्मारक उभारण्याचा व बालोद्यान तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी सुमारे 80 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. शिवस्मारकाबाबत लोकांनी मदत करावी, यासाठी त्याची माहिती पोहोचविण्याचे ठरवले आहे. त्यानुसार बुधवारी डॉ. अमर अडके यांनी तयार केलेला "किल्ले विजयदुर्ग' हा स्लाईड शो दाखविण्यात येणार आहे. तसेच शिवस्मारकाचा आराखडाही दाखवण्यात येईल. या प्रसंगी ऐतिहासिक शस्त्रास्त्रसंग्राहक गिरीश जाधव व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे उपस्थित राहणार आहेत.'' स्मारकाच्या उभारणीसाठी तमाम शिवभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. पत्रकार परिषदेस डॉ. अमर अडके, अमित कोळेकर, सूरज ढोली उपस्थित होते.

No comments: